सहारनपूर : शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांसाठीही फायदेशीर ठरलेले ऊसाचे को-०२३८ हे वाण रोगाच्या विळख्यात सापडले आहे. पूर्व तसेच मध्य उत्तर प्रदेशमध्ये या प्रजातीला लाल सड रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ऊस विभागही हवालदिल झाला आहे. आता ऊस विभागाने या प्रजातीऐवजी दुसरे वाण आणण्याची तयारी केली आहे. तेथे चांगल्या प्रजातीचे वाण लावले जाईल.
जिल्ह्यामध्ये ऊसाचे पेरणी क्षेत्र १.०७ लाख हेक्टर इतके आहे. यापैकी तब्बल ९२ टक्के ऊस फक्त को -०२३८ या प्रजातीचा आहे. यामध्ये उसाचा कॅन्सर मानल्या जाणाऱ्या लाल सड रोगाचा फैलाव दिसून आला आहे. पूर्वोत्तर आणि मध्य उत्तर प्रदेशमध्ये या रोगाने मोठे नुकसान केले आहे. सद्यस्थितीत या रोगाचा फारसा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही. ऊस विगाभाने या प्रजातीऐवजी काही नव्या, रोगांबाबत चांगली प्रतिकारशक्ती असलेल्या वाणांची लागण करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना जिल्ह्यातील ऊस संशोधन केंद्रांपर्यंत नेऊन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रजातींना मिळणार प्राधान्य
उसाच्या को ०२३८ या जातीऐवजी आता अधिक चांगल्या वाणाची लागवड होईल. त्यामध्ये सीओ ११८, सीओ ०८२७२, कोशा १३२३५, कोशा १३२३१ आणि सीओ १५०२३ यांचा समावेश असेल. ऊस विभागाकडून ऊसाला रोगांपासून वाचविण्यासाठी संशोधनावर भर देण्यात आला आहे. याशिवाय उसावरील बिजप्रक्रियेला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करे फायदेशीर ठरत असल्याचे आढळून आले आहे.
जिल्ह्यामध्ये उसावर सातत्याने होणारा रोगाचा फैलाव पाहता ऊस विभागाने सीओ ०२३८ प्रजातीचे वाण हळूहळू बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याऐवजी नव्या दमाचे वाण लावले जाईल. ऊसाच्या वाणांचे संतुलन टिकवून ठेवण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. त्यातून शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवाता येईल असे जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहन मणी त्रिपाठी यांनी सांगितले.