पटना : सर्व बंद साखर कारखान्यांचे काम सुरू केले जाईल. यासोबत इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू होईल असे बिहारचे उद्योगमंत्री शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. राज्यातील या क्षेत्रातील गुंतवणूकदारांचे स्वागत आहे असे हुसेन म्हणाले.
मंत्री हुसेन यांनी विधानसभेत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये उद्योग विभागाच्या अर्थसंकल्पीय मागणीबाबत चर्चेला उत्तर देताना सांगितले की, नीतीनश कुमार सरकारने बिहारमध्ये इथेनॉल उत्पादनासाठी २००६-०७ मध्ये केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली होती. मात्र तेव्हा सरकारने मंजुरी दिली नव्हती. मंजुरी नाकारणाऱ्या युपीए सरकारने तेव्हा बिहारला दुय्यम वागणूक दिली होती. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासात अडचणी निर्माण झाल्या.
मंत्री हुसेन म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारने बिहारमध्ये इथेनॉल उत्पादनाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी दूरगामी निर्णय घेतले आहेत. सद्यस्थितीत बिहारच्या औद्योगिक प्रोत्साहन धोरणाला पूरक उद्योग आहेत. राज्यात इथेनॉल उत्पादन क्षेत्रात मोठ्या गुंतवणूकीची अपेक्षा आहे. राज्य सरकार बिहारमध्ये औद्योगिक संस्थांच्या स्थापनेसाठी येणाऱ्या गुंतवणूकदारांचे स्वागत करेल असे मंत्री हुसेन यांनी सांगितले.