पंजाब: शुगरफेडच्या अध्यक्षपदी पुन्हा अमरिक सिंह अलीवाल

चंडीगढ : पंजाब सरकारने माजी खासदार अमरिक सिंह अलीवाल यांची शुगरफेडच्या अध्यक्षपदी फेरनिवड केली आहे. सहकार विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. नव्या अध्यक्षांचे अभिनंदन करताना सहकार मंत्री एस. सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सांगितले की सहकार विभाग पंजाबच्या कृषी क्षेत्राशी जोडले गेला आहे. राज्य सरकारकडून विविध संस्थांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मंत्री रंधावा म्हणाले, अलीवाल हे तळागळाशी जोडले गेलेले नेते आहेत. ते शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्या अनुभवाचा शुगर फेड संस्थेच्या प्रगतीसाठी होईल. पारंपरिक गहू, तांदूळ या पिकांच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढून ऊस शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. अलिवाल यांच्या पहिल्या कार्यकाळात भोगपूर साखर कारखान्याचा कार्यविस्तार करण्यात आला. तर कलानौरमधील अत्याधुनिक ऊस संशोधन केंद्राशिवाय बटाला आणि गुरुदासपूर येथे नवे कारखाने स्थापन करण्यात येत आहेत.

अमरिक सिंह अलीवाल यांनी आपली राजकीय कारकिर्द लुधियाना जिल्ह्यातील अलीवाल गावच्या सरपंचपदापासून सुरू केली. ते दोनदा खासदार होते. पंजाब अॅग्रोचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. २०१९ मध्ये ते शुगरफेडचे पहिल्यांदा अध्यक्ष बनले. आपल्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि एस. सुखजिंदर सिंह रंधावा यांचे आभार व्यक्त करताना अलिवाल यांनी जबाबदारी पूर्ण करू असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here