श्रीलंका: देशात साखरेची कमतरता नसल्याचा सरकारचा दावा

श्रीलंकेत गतीने घसरत असलेल्या परकीय चलनाच्या संकटामुळे खाद्यपदार्थ तुटवड्याचे संकट घोंगावत असल्याचे वृत्त सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले.

देशाचे अर्थ आणि निधी बाजार विकास मंत्री अजित निवार्ड काबराल यांनी सांगितले की, श्रीलंकेत खाद्यपदार्थांची अजिबात कमतरता नाही. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यपदार्थांचा तुटवडा भासत असल्याच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ते म्हणाले, बेईमान साठेबाजांनी केलेल्या साखरेच्या टंचाईवर कायदेशीर पद्धतीने मार्ग काढण्यात आला आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी गेल्या आठवड्यात साखर, तांदूळ आणि इतर जीवनावश्यक खाद्यपदार्थांची साठेबाजी रोखण्यासाठी आणिबाणी जाहीर केली होती.

माहिती विभागाने गेल्या आठवड्यात एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले होते की देशात खाद्यपदार्थांची कमतरता असल्याच्या स्थानिक आणि परदेशी माध्यमांतील वृत्त निराधार आहे. खाद्यपदार्थांचा तुटवड्याबाबतच्या वृत्ताला, अहवालांना कोणताही आधार नाही. देश सद्यस्थितीत कोणत्याही वस्तूच्या तुटवड्याशी सामना करीत नाही.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here