उत्तर प्रदेशात उसाचा पाला जाळणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात दाखल केलेले गु.in मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जारी केले. बुधवारी या आदेशावर शिक्कमोर्तब करण्यात आले. अलिकडेच मुख्यमंत्री योगी यांनी शेतकऱ्यांवरील पाला जाळण्याशी संबंधीत खटले मागे घेतले जातील असे जाहीर केले होते. दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
सरकारच्या या निर्णयाला पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी शेतकऱ्यांना खूश करण्याच्या प्रयत्नांशी जोडले जात आहे. अप्पर मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी याबाबत पोलीस आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि एसएसपींसाठी आदेश जारी केले. याबाबत म्हटले आहे की, उत्तर सरकार शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कटीबद्ध आहे. शेतकरी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. शेतकऱ्यांचे हीत सर्वोच्च असल्याने शेतकऱ्यांविरोधात पाला जाळण्याबाबत दाखल ८६८ खटले तातडीने रद्द करावेत असे आदेश दिले आहेत.
व्हाट्सप्प पर चीनीमंडी के अपडेट्स प्राप्त करने के लिए, कृपया नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें.
WhatsApp Group Link