डिझेल-इथेनॉल मिश्रणाच्या तंत्रज्ञानावर काम सुरू

पुणे : पेट्रोल आणि इथेनॉल मिश्रणानंतर आता डिझेल-इथेनॉल मिश्रणाच्या तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. जैव-ऊर्जा आणि एन्झाइम फर्म प्राज इंडस्ट्रीजचे सीईओ आणि एमडी, शिशिर जोशीपुरा यांनी दि टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितले की, कंपनीने इथेनॉलसोबत डिझेल मिश्रण तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी अनेक घटकांसोबत प्रयत्न सुरू केले आहे. प्राज ही भारतात इथेनॉल उत्पादन तंत्रज्ञानाच्या प्रमुख पुरवठादारांपैकी एक आहे. अनेक साखर कारखाने उसापासून इथेनॉल उत्पादन करण्यासाठी प्राज इंडस्ट्रीजसोबत काम करीत आहेत. आणि प्राजने साखर कारखान्यांना दीर्घ काळासाठी उसाचा रस साठवणुकीत मदत करण्यासाठी आपल्या बायो सिरप तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. कंपनी भारतातील प्रमुख तेल कंपन्यांसोबत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणावरही काम करीत आहे.

जोशीपुरा यांनी सांगितले की, आम्ही भारतात सुरू असलेल्या ई २० (२० टक्के इथेनॉल आणि पेट्रोल मिश्रण) योजनेनुसार डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा प्रयत्न करीत आहोत. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आम्ही ARAI सारख्या हितधारक आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस, अवजड उद्योग अशा विविध केंद्रीय मंत्रालयांसोबत काम करीत आहोत. इथेनॉलचे डिझेलमध्ये मिश्रणासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जोशीपुरा यांनी सांगितले की, आम्ही पुढील काही वर्षात याचे परिणाम निश्चितच दिसतील अशी अपेक्षा बाळगून आहोत. ते म्हणाले की, वाहनांमध्ये बायो-डिझेलच्या वापराशिवाय स्थिर डिझेल इंजिन, जशा पॉवर बॅकअप जनरेटर अथवा सेल फोन टॉवर जनरेटरलाही बायो डिझेल तंत्रज्ञानात आणता येऊ शकते. जोशीपुरा यांनी दावा केला की, टिकाऊ, स्वच्छ विमान इंधनसुद्धा पुढील तीन ते चार वर्षात प्रत्यक्षात येऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here