गूळ युनिट्सचे क्लस्टर बनवून इथेनॉल उत्पादनाची परवानगी द्या : राजू शेट्टी

कोल्हापूर : राज्यात गूळ उत्पादक युनिट्सचे क्लस्टर तयार करून इथेनॉल उत्पादनाची परवानगी दिली जावी अशी मागणी शेतकरी नेते आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी यांनी या मागणीबाबत चर्चेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यांनी दावा केली की, भारतात उत्पादन होणाऱ्या १५ टक्के उसापासून गूळ तयार केला जातो. गूळ तयार करणे हा पारंपरिक व्यवसाय आहे. आणि साखरेच्या उलट याचा वापर कमी प्रमाणात केला जातो. ते म्हणाले की, सद्यस्थितीत फक्त साखर कारखान्यांनाही इथेनॉल उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्रात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आपली गाळप क्षमता वाढवत आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर ऊस पाठवला जाईल. त्यातून गूळ युनिट्सना उसाच्या टंचाईचा सामना करावा लागेल. यातून पारंपरिक व्यवसाय अडचणीत येईल. गूळ युनिट सद्यस्थितीत तोट्यात आहेत. जर त्यांना इथेनॉल उत्पादन करण्याची अनुमनती देण्यात आली तर ते नुकसान भरपाई करू शकतात असा दावा शेट्टी यांनी केला.

शेट्टी म्हणाले की, जर आठ ते दहा गूळ युनिट्सकडून प्रती दिन ७,००० लिटर क्षमतेचे एक इथेनॉल युनिटची परवानगी देण्यात आली तर त्यासाठी सुमारे ५०० टन उसाची गरज भासेल. इतका ऊस गूळ युनिटकडे सहज उपलब्ध असतो. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या गोष्टीबाबत सहमती दर्शवली आहे. ग्राहक व्यवहार विभागाला याबाबत प्रस्तावाची सूचना त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here