ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी देण्यास प्राधान्य देणार

आजमगढ : दि किसान सहकारी साखर कारखान्याचे नूतन सरव्यवस्थापक अनिल चतुर्वेदी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. नवे सरव्यवस्थापक चतुर्वेदी हे यापूर्वी मार्टीनगंज येथे एसडीएम होते. तेथून आता ते किसान सहकारी साखर कारखाना लिमिटेड सठियांवमध्ये सरव्यवस्थापक पदी रुजू झाले आहेत.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कार्यभार स्वीकारल्यानंतर नूतन जीएमनी साखर कारखान्याला चांगले व्यवस्थापन देण्यासाठीच्या हालचाली गतीमान केल्या आहेत. ते म्हणाले की, साखर कारखान्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले देण्यास प्राधान्य दिले जाईल. शेतकऱ्यांना हरेक प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांकडून नव्या प्रजातीच्या उसाची लागवड केली जावी, यासाठी खास लक्ष पुरवले जाईल. त्याचा फायदा कारखाना आणि शेतकरी अशा दोन्ही घटकांना होईल. राज्यात हा कारखाना सर्वात चांगल्या स्थितीत आहे. मात्र, सद्यस्थितीत उत्पादक शेतकरी ऊस शेतीपासून दूर का जात आहेत, याचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. शेतकरी ऊस शेतीकडे वळावेत आणि साखर कारखान्याचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here