गाळप क्षमता वाढविल्यानंतरही साखर उत्पादनात सोनीपत कारखाना पिछाडीवर

सोनीप: दी सहकारी साखर कारखाना सोनीपतचा गळीत हंगामाची सत्र समाप्तीदरम्यान अखेरच्या काही दिवसांत साखर उत्पादन अतिशय कमी राहिले. साखर उत्पादन गेल्या गळीत हंगामापेक्षा कमीच झाले. राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा चांगला उतारा देणाऱ्या या कारखान्यात अखेरच्या काही दिवसात साखर उत्पादनात घसरणच झाली. कारखान्याच्या ऊस विभागाच्या बेफिकीर कारभारामुळे कारखान्याला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. साखर उत्पादनात इतर कारखान्यांपेक्षा पिछाडीवर राहावे लागले.

हरीभूमी डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, सहकारी साखर कारखान्याचा २०२१-२२ मधील गळीत हंगाम दरवर्षीप्रमाणे एक आठवडा आधीच सुरू झाला होता. कारखान्याची ऊस गाळप क्षमता २२ हजार क्विंटल असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या क्षमतेनुसार कारखाना चालला नाही. सुरुवातीच्या टप्प्यात बॉयलर व तांत्रिक खराबीमुळे गळीत हंगाम रुळावर आणण्यासाठी अधिकारी, कर्चमाऱ्यांना प्रचंड प्रयत्न करावे लागले. खरेतर गळीत हंगाम एप्रिल अथवा मे महिन्यापर्यंतच सुरू राहतो. मात्र, यंदा जून महिन्यातही कारखाना सुरू राहिला. अखेरच्या वीस दिवसात कारखान्याला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. २०२०-२१ या गळीत हंगामात तीन लाख ३०० क्विंटल साखर उत्पादन झाले होते. तर यंदा फक्त दोन लाख ७६ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गळीत हंगामात वारंवार कारखाना बंद पडला होता. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. कारखान्याच्या गेल्या गळीत हंगामात एमडी जितेंद्र जोशी यांची बदली झाली होती. त्यानंतर नवी पदभरती झाली नाही. आरटीओ मानव मलिक यांच्याकडे पदभार दिला गेला. मात्र, आहुलाना व एसडीएम गोहाना कारखान्याचा कार्यभार असल्याने ते याकडे लक्ष देऊ शकले नाहीत. यंदाच्या हंगामात २ लाख ७६ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. हे उत्पादन गतवर्षीपेक्षा कमी असल्याचे एमडी नवदीप सिंह यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here