उत्तर प्रदेश : ऊस उत्पादनात शामली जिल्हा पुन्हा राज्यात अव्वल

शामली : उत्तर प्रदेश ऊस तथा साखर विभागाने जारी केलेल्या तोडणी अहवालाच्या आधारावर शामली जिल्हा ऊस उत्पादकतेमध्ये सलग चौथ्या वर्षीही प्रथम क्रमांकावर आहे. यावर्षी शामली जिल्ह्यात १०१४.१६ क्विंटल प्रती हेक्टर ऊस उत्पादन झाले आहे. द्वितीय क्रमांकावर मुजफ्फरनगर आणि तिसऱ्या क्रमांकावर मेरठ जिल्हा आहे. ऊस आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, शामली जिल्ह्याने चौथ्यांदा हा बहुमान मिळवला आहे. २०१८-१९ मध्ये शामली जिल्ह्यात सरासरी ऊस उत्पादन ९६२.१२ क्विंटल प्रती हेक्टर होते. २०१९-२० मध्ये ९९०.६४ क्विंटल, २०२०-२१ मध्ये १००४.२८ क्विंटल प्रती हेक्टर ऊस उत्पादन राहिले. तर यंदा २०२१-२२ मध्ये उत्पादकता १०१४.१६ क्विंटल प्रती हेक्टरवर पोहोचली.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, मुजफ्फरनगर जिल्ह्याने ऊस उत्पाजन ९३३.०८ क्विंटल प्रती हेक्टर करून तो द्वितीय क्रमांकावर आहे. तर मेरठ जिल्ह्यात ९१४.७२ क्विंटल प्रती हेक्टर ऊस उत्पादकता आहे. हा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वीही एखादा अपवाद वगळला तर शामली जिल्ह्याने आपला पहिला क्रमांक टिकवला आहे. जलालपूरमधील शामली कृषी विज्ञान केंद्राचे कृषी संशोधक डॉ. विकास कुमार मलिक यांनी सांगितले की, नव्या तंत्राचा स्वीकार करून ऊस उत्पादक शेतकरी आपले उत्पादन वाढवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here