उत्तर प्रदेश : मुंडेरवा, पिपराईच साखर कारखाने आता पॅकेटमध्ये साखर विक्री करणार

उत्तर प्रदेश राज्य साखर महामंडळाच्या पिपराईच तथा मुंडेरवा साखर कारखान्यांच्यावतीने रिटेल काऊंटर सुरू करण्यात येणार आहे. आता पाच किलो पॅकेट तसेच पाच ग्रॅमच्या सॅशेमध्येही साखर विक्री केली जाणार आहे. ऊस मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी हे लखनौ ऊस संशोधन केंद्राच याचे उद्घाटन करतील. उत्तर प्रदेश राज्य साखर महामंडळ तथा उत्तर प्रदेश सहकारी कारखाना संघाच्या २७ कारखान्यांकडून उत्तम गुणवत्तेची, सल्फरलेस साखर तसेच प्लांटेशन शुगरचे उत्पादन केले जाते. देशभरातील ग्राहकांव्यतिरिक्त साखरेची विविध देशात निर्यात केली जाते.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, महामंडळाच्या पिपराईच तथा मुंडेरवा साखर कारखान्याच्या सल्फरलेस साखरेला बाजारात मागणी आहे. आतापर्यंत या कारखान्यांच्यावतीने केवळ ५० किलोच्या पॅकिंगमध्ये साखर उपलब्ध करुन दिली होती. मुख्यमंत्र्यांनी कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले जावेत असे सांगितले आहे. त्या अनुषंगाने ऊस मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांच्या हस्ते डालीबाग, लखनौतील ऊस संशोधन संस्थेच्या परिसरात साखरेचे रिटेल काऊंटर सुरू होईल. महामंडळाकडून हा नवा प्रयोग केला जात असल्याचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here