कोल्हापूर : येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचा हंगाम पूर्ण तांत्रिक कार्यक्षमतेने चालवून १४ लाख मे. टनाहून अधिक उसाचे उच्चांकी गाळप करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे, असे प्रतिपादन वारणा सहकारी समुहाचे प्रमुख व माजी मंत्री डॉ. विनय कोरे यांनी केले. उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व शेतकरी सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सातवे पैकी शिंदेवाडी येथील काकास शामराव शिंदे, चावरे येथील काकासो शंकर पाटील, टोप येथील कल्लेश्वर मारुती मुळीक, ऐतवडे खुर्द येथील कृष्णात दगडू परीट, मांगले येथील केशव हिंदुराव पाडळकर, यांच्या हस्ते धार्मिक विधी, उसाचे व ऊस घेऊन आलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. डॉ. विनय कोरे, वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक एस. आर. भगत व संचालकांच्या हस्ते चालकांचा सत्कार करण्यात आला. कोरे यांच्या हस्ते ऊस गव्हाणीत टाकण्यात आला.
बँक ऑफ बडोदाचे असि. जनरल मॅनेजर राकेश सुमन, सीनिअर मॅनेजर इम्रान तांबोळी, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर राजू सिंग, ॲग्री हेड संदीप गोरडे, बँक ऑफ इंडिया शाखा अमृतनगरचे चीफ मॅनेजर जे. आर. गायकवाड व ॲग्री ऑफिसर राहुल सिसार यांच्यासह अधिकारी-कर्मचारी, वारणा समुहातील संस्थांचे पदाधिकारी, वाहतूक कंत्राटदार, व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते.