कोल्हापूर, दि.11 ऑगस्ट 2018: देशात आणि राज्यात तर उत्पादनाची विक्रमी वाढ झाल्यानंतर यावर्षी म्हणजे 1 ऑक्टोबर 2018 पासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये अतिरिक्त साखरेचा साठा हा त्रासदायक ठरणार आहे. गेल्या वर्षीचा सुमारे 50 लाख टन साखर साठा शिल्लक आहे हा साखरेचा साठा ठेवायचा कुठे हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
त्यात या गळीत हंगामातील ५० लाख टन साखर साठा. आणि 2018-19 मध्येही 110 लाख टनाइतके साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे आधीच हाउसफुल असलेली
कारखान्यांकडील गोदामे साखर साठवणुकीसाठी कमी पडणार आहे. याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे कारखान्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या मांडल्या.