आसाम : पुरामुळे हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

बारपेटा : आसाम मधील पुरामुळे स्थिती आणखी बिघडली आहे. राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये ३१.५४ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. बारपेटा जिल्ह्यात जवळपास ५.५० लाख लोक आणि ४८७ गावांचे पुराने नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण २६,६८४.५० हेक्टर जमिनीवर सध्या पुराचे पाणी पसरले आहे. भिषण पुरामध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विभागातील अनेक घरे पाण्यात पूर्णपणे बुडाली आहेत. अशी कोणतीही जागा नाही, की जिथे ग्रामस्थांना आसरा घेता येईल. प्रत्येक भागात पाणी शिरले आहे. अनेक लोकांना रस्त्यावर तात्पुरता आसरा घ्यावा लागला आहे.

पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ग्रामस्थ मजुरी करतात. पुरामुळे या ग्रामस्थांना आणखी समस्यांचा सामना करावा लागणार आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २६ जिल्ह्यांतील २६७५ गाव आणि ९१,३४९ हेक्टरमधील पिकांवर आताही पुराचे पाणी पसरले आहे. हा विनाशकारी पूर आणि भुस्खलनामुळे यावर्षी आतापर्यंत राज्यात १५१ लोकांचा बळी घेतला आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे २८ जिल्ह्यांतील ३३.०३ लाक लोकांना फटका बसला आहे. यावर्षी राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ११८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये फक्त पुरात १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरीत १७ जणांचा मृत्यू भुस्खलनामुळे झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here