या कारणामुळे ब्राझीलमध्ये इथेनॉलऐवजी साखरेला मिळणार झुकते माप 

 

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

नवी दिल्ली : चीनी मंडी

इथेनॉलच्या किमती घसरल्यामुळे आता ब्राझीलमध्ये ऊस मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादनासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलांच्या घसरलेल्या किमती आणि इथेनॉलचा वाढता स्टॉक याचा परिणाम साखरेच्या दरांवरही झाला. विशेष म्हणजे २०१८मध्ये किमती ३० टक्क्यांपर्यंत घसरल्या. त्यामुळे आता ब्राझीलचा एप्रिलपासूनचा दुसरा ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांना निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यात इथेनॉलऐवजी साखरेला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे.

 

ब्राझीलमधील साओ पावलो येथील डेटॅग्रो कंपनीचे प्लिनिओ नास्टारी म्हणाले, ‘साखरेला इथेनॉल फायद्याचे होते. आता हा फायदा दिसेनासा झाला आहे.’ जानेवारी महिन्यात डेटॅग्रो कंपनीने २०१९-२०च्या हंगामात ब्राझीलचा साखर पट्ट म्हणून ओळखल्या जणाऱ्या दक्षिण मध्य प्रांतात २८.८ लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. २०१८-१९ मधील उत्पादनाच्या ८.९ टक्के उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे.

 

साखरेच्या मागणीमध्ये आता नव्याने वाढ होऊ शकते. कारण, जागतिक बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे, असे नास्टारी यांनी सांगितले. बाजारपेठ या हंगामातच अतिरिक्त पुरवठ्यावरून ३० लाख टन तुटवड्यापर्यंत खाली येणार आहे. तर, पुढच्या हंगामात हा तुटवडा ८० लाख टनापर्यंत जाईल, अशी भीती डेटॅग्रोने व्यक्त केली आहे.

 

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here