इथेनॉल मिश्रणामुळे इंधन आयात खूप कमी होईल: मुख्यमंत्री

बंगळुरू : वाहन निर्मात्यांनी सर्वसामान्यांसाठी किफायतशीर इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यावर भर दिला पाहिजे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बोम्मई यांनी ईव्ही अभियान २०२२ आणि १५२ ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले की, राज्य सरकारने हायड्रोजन इंधनाच्या उत्पादनासाठी दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हायड्रोजनला अक्षय्य ऊर्जेच्या स्त्रोताच्या रुपात पाहिले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठीच्या सर्वंकष योजनेच्या रुपात तेलामध्ये इथेनॉल मिश्रण २० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, या उपाययोजनेमुळे आगामी काही वर्षात आपली इंधन आयात खूप कमी होऊ शकेल. ते म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती सर्वसामान्य व्यक्तींसाठी स्वस्त असल्या पाहिजेत. तरच त्याच्या वापरात वाढ दिसू शकते. उत्पादकांनी या गोष्टीवर विचार केला पाहिजे. ते म्हणाले की, राज्य सरकारने आपल्या नव्या ईव्ही धोरणासोबत सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशन स्थापन करण्यासाठी बेंगळुरू इलेक्ट्रिसिटी वितरण कंपनी लिमिटेडला (बीईएससीओएम) नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.

बोम्मई म्हणाले की, बॅटरीची अदलाबदल हा इलेक्ट्रिक वाहनांतील एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. आगामी कालात याचे महत्त्व वाढेल. अक्षय्य ऊर्जेवर भर देताना बोम्मई म्हणाले की, नव्या ऊर्जा स्त्रोतांचा विकास ही अपरिहार्यता आहे. कारण नैसर्गिक इंधन कमी होत आहे. आणि ते पर्यावरणाला धोका पोहोचवत आहे. इलेक्ट्रिक वाहने या बाबतीत महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. आता मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यावर येत आहेत. आणि लवकरच इलेक्ट्रिक बस, कार आणि मल्टी अॅक्सल ट्रकही बाजारात येतील. बोम्मई म्हणाले की, राज्य सरकारने बेंगळुरू मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये आणखी ईव्ही बस सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक देशाक सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश आहे. सौर ऊर्जेची साठवणूक हे मोठे आव्हान आहे. याबाबत केंद्र सरकारच्या सहकार्याने पीएसपी योजना सुरू केली आहे. लवकरात लवकरएसपी युनिट सुरू होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here