एक रकमी एफआरपी शासनाने अनुदान द्यावे

साखर कारखानदारांची मागणी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

कोल्हापूर : साखरेचा प्रति क्विंटल किमान विक्रीदर 2900 वरून 3400 रुपये करावा. एफआरपी रक्कम दोन टप्प्यात देण्यास परवानगी द्यावी किंवा एक रकमी एफआरपी देण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार आहे. गुरुवारी(ता. 10) दहा कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी ही मागणी करणार असल्याचा निर्णय साखर कारखाने आज घेतला. आज येथील खाजगी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला.

साखरेचा उठाव केला जात नाही. प्रतिक्विंटल साखरेच्या दरात घट होत चालली आहे. शासन साखरेचा किमान विक्री दर वाढवत नाही. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. सध्या एकरकमी एफआरपी देणे कठीण होऊन बसले आहे. मात्र सरकार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमी एफआरपी द्यावी या भूमिकेवर ठाम असल्यामुळे साखर कारखानदारांमध्ये अस्वस्था आहे. दरम्यान शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत नसल्याने त्यांना त्यांचा पुढील व्यवहार करता येत नाही. आजच्या बैठकीमध्ये एफआरपी देण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्याचा निर्णय झाला आहे. शासनाने प्रति क्विंटल साखरेचा विक्री दर वाढवावेत अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र शासन याकडे लक्ष देत नाही याचा या पार्टी देण्यावर मोठा परिणाम होत. आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखरेचा किमान विक्री दर वाढवण्याची ग्वाही दिली होती, मात्र अद्याप कारवाई झालेली नाही त्यामुळे साखर कारखाने अडचणीत येत आहेत. एकीकडे जास्तीत जास्त लागत असताना दुसरीकडे मात्र कमी दराने विक्री करावी लागत आहे. शेतकरी आणि कारखानदार आहे टिकवण्यासाठी शासनाने अनुदान रूपे मदत करावी लागणार आहे. शासनाला अनुदान देण्याचे जमत नसेल तर एकरकमी एफआरपी देण्यासाठी अनुदान द्यावे, अशीही मागणी केली जाणार आहे. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर आदी उपस्थित होते.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here