ऊस प्रजनन संस्थेच्यावतीने दोन नव्या उच्च प्रजातीच्या वाणांचे संशोधन सुरू

कर्नाल : ऊस प्रजनन संस्था, कर्नाल (ICAR-Sugarcane Breeding Institute) च्या विभागीय केंद्राच्या संशोधकांनी उसाच्या लवकर उगवण होणाऱ्या दोन नव्या, चांगल्या प्रतीच्या व्यावसायिक वाणांवर काम सुरू केले आहे. याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. याबाबत उपलब्ध माहितीनुसार, दोन्ही प्रजातींचे वाण अद्याप संशोधनाच्या टप्प्यात आहेत. यावर्षी सप्टेंबरमधील लागणीपूर्वी शेतकऱ्यांना ‘Co 16034’ प्रजातीचे बियाणे उपलब्ध होईल. मात्र, दुसऱ्या प्रजातीसाठी आणखी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. ‘Co 17018’ हा प्रजाती उशीरा, ऑक्टोबर २०२३ मध्ये बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. अलिकडेच जारी करण्यात आलेल्या ‘Co 15023’ या ‘सुपर अर्ली व्हरायटीलाही शेतकऱ्यांचा चांगला प्रतीसाद मिळत आहे. कारण, उन्हाळा आणि वसंत ऋतुमध्ये याची लागण केली जाते. शरद ऋतुमध्ये याची लागवड केली जात नाही.

हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक दिलाशाची बाब आहे. कारण मोठ्या प्रमाणावर उत्पादन देणारी ‘Co 0238’ या प्रजातीवर अचानक किडींचा फैलाव झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आयसीएआर-ऊस संशोधन संस्था कोईंबतूरचे संचालक डॉ. जी हेमप्रभा यांनी सांगितले की, या प्रजाती निर्मितीच्या टप्प्यात आहेत. ‘Co 16034’चे लाँचिंग यावर्षी सप्टेंबर महिन्यात केले जाईल. तर इतर प्रजातीचे वाण ऑक्टोबर २०२३ मध्ये येतील. त्यांनी सांगितले की, दोन्ही प्रजाती अधिक उत्पन्न देणाऱ्या, कमी कालावधीत लागणीच्या आहेत. या प्रजाती आगामी काही वर्षात ‘Co 0238’ला चांगा पर्याय म्हणून पुढे येतील. कृषी तज्ज्ञ आणि ऊस उद्योगातील लोकांच्या माहितीनुसार, नव्या प्रजातीची गरज होतीच. कारण गेल्या दोन वर्षात किडींच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. आता संस्थेने केलेल्या संशोधनातून ऊस उत्पादकांना नवा आशेचा किरण दिसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here