जुनी साखर विकण्याचे आव्हान; गोदामांत नव्याची भर

बिजनौर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

गेल्या वर्षी साखरेचे झालेले बंपर उत्पादन कारखान्यांसाठी डोकेदुखी ठरली होती. जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये गेल्या हंगामातील १६.११ लाख क्विंटल साखर अजूनही पडून आहे. त्यात नव्या हंगामातील स्टॉकची भर पडू लागली आहे. आता गेल्या हंगामातील निकाली साखर विक्री करणे कारखान्यांसाठी आव्हान ठरत आहे.

गेल्या वर्षी ऊस आणि साखर दोन्हीच्या उत्पादनाने उच्चांकी प्रस्थापित केले होते. जिल्ह्यात पहिल्यांदाच साखर कारखान्यांनी १० कोटी क्विंटल उसाचे गाळप केले होते. अगैती जातीच्या उसामुळे साखरेचे उत्पादनही चांगले झाले.

गेल्या हंगामात जिल्ह्यात १२६.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. जिल्ह्यातील गोदामे साखरेच्या पोत्यांनी भरली आणि दर मात्र घसरले.

साखरेचे दर २५०० रुपये प्रति क्विंटलच्याही खाली घसरले होते. त्यानंतर सरकारने साखरेचा किमान विक्री दर २९०० रुपये जाहीर केला. पण, गेल्या वर्षी उत्पादनच इतक्या मोठ्याप्रमाणावर झाले की, अजूनही साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये गेल्या हंगामातील साखर पडून आहे. त्यामुळे कारखानदारांना साखर विक्री करण्यासाठी आकाश-पाताळ एक करावे लागत आहे. त्यातच आता नव्या साखरेची भर पडू लागली आहे. तरी, यंदा ऊस कमी झाल्याने गेल्या हंगामाच्या तुलनेत उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. हंगाम संपल्यानंतर काही दिवसांत साखरेच्या दरांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.

कारखान्यांच्या पदरात नुकसानच

यंदाच्या गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेच्या दरांमध्ये प्रति क्विंटल १०० रुपयांची उसळी आली आहे. नोव्हेंबर महिन्यात साखरेचा दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल होता. तर, सध्या दर ३१०० रुपयांवर आहे. बिलाई साखर कारखान्यांचे ऊस महाप्रबंधक परोपकार सिंह यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या हंगामातील साखर विकली जात नाही. बाजारात साखरेचे दर खूपच कमी आहेत. त्यामुळे कारखान्यांना या हंगामातही नुकसान सहन करावे लागत आहे.

 

हंगामातील साखर कारखान्यामधील साखरेची स्थिती (आकडे लाख क्विंटलमध्ये)

कारखाना साखर

धामपूर        ०८

स्योहारा       ६.३१

बिलाई        ६.२९

बहादरपूर     ४.५०

बरकातपूर    ४.७२

बुंदकी        ४.५३

चांदपूर       १.८८

बिजनौर      १.१३

नजीबाबाद   २.०२

—————————

एकूण ३९.३८ लाख क्विंटल

 

डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here