शेअर बाजारात भुकंप; सुमारे ४ लाख कोटींचे नुकसान

मुंबई : चीनी मंडी

गेल्या काही दिवसांत घसरणीला लागलेल्या मुंबई शेअर बाजारात आज अक्षरशः भुकंप झाला. सकाळच्या टप्प्यातच निर्देशांक १ हजार अंकांनी घसरला. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांतच गुंतवणूक दारांचे ४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील पडझडीचा परिणाम भारतीय बाजारात दिसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

रुपयाची स्थिती थोडी सुधारल्यामुळे काल (बुधवार) शेअर बाजारात थोडे उत्साहाचे वातावरण होते. पण, आजची सकाळ शेअर बाजारासाठी धक्कादायक होती. बाजाराची सुरुवातच गडगडाटाने झाले. सकाळी बाजार ६९७.०७ अंकांनी कोसळून३४,०६३.८२ वर उघडला. ही घसरण सुमारे २.०१ टक्क्यांची होती. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या निराशाजनक वातावरणात बाजार असा सुरू झाल्याने त्याचा परिणाम पुढील व्यवहारांवर झाला. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांत १ हजार १.३१ अंकांनी घसरून ३३ हजार ७५९.५८वर घसरला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान डॉ़लरच्या तुलनेत रुपया किंचित वधारला आहे. रुपयाचे मुल्य १८ पैशांना वधारले आहे.

 

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here