ऊस थकबाकीप्रश्नी शेतकऱ्यांची निदर्शने

गाझीयाबाद : मोदीनगरमध्ये उसाची थकबाकी द्यावी, या मागणीसाठी भाकियुच्या (अराजकीय) कार्यकर्त्यांनी बुधवारी तहसीलवर निदर्शने केली. मोदी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची तीनशे कोटींहून अधिक थकबाकी असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन दिले. भारतीय किसान युनियनचे ज्येष्ठ नेते सतेंद्र त्यागी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी मोदीनगर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.

भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, शेतकरी नेते सतेंद्र त्यागी म्हणाले की, साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची तीनशे कोटींहून अधिक थकबाकी आहे. उसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुलांची फी, मुलींची लग्ने अशा कामात अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना उसाचा मोबदला मिळत नसून वीज विभाग बिल थकीत असताना वीज कनेक्शन तोडत आहे. प्रशासनाची ही दुटप्पी वृत्ती खपवून घेतली जाणार नाही. ऊसाचे पैसे लवकर न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांनी तहसीलदार हरिप्रताप सिंह यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले. यावेळी दर्शन नेहरा, विनीत त्यागी, मनोज त्यागी, संदीप जिंदवाल, संदीप त्यागी, कामिल सारा, जहीर खान, सुंदरलाल फौजी, अंकुर त्यागी, अमित गिरी, रिंकू त्यागी, आनंद त्यागी आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here