पुढील वर्षी उसाचा दर घसरणार

अतिरिक्त साखरेचा परिणाम : दोन वर्षाची 90 लाख टन साखर शिल्लक

कोल्हापूर , 20 मे 2018 : देशात गेल्यावर्षी 40 लाख व यावर्षीची 50 लाख अशी एकूण सुमारे 90 लाख टन साखर शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी उसाला जाहीर झालेली किमान वैज्ञानिक दर (एफआरपी) देण्यासाठी साखर कारखान्यांना कसरत करावी लागत आहे. देशातील याच अतिरिक्‍त साठ्यामुळे पुढील वर्षी साखर दराचा प्रश्‍न गंभीर होणार आहे.
देशात आतापर्यंत 310 मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे देशातील ऊस आणि साखर उत्पादन वाढीवर चांगला परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातही चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे, उस्मानाबाद, लातूरसहविर्दभातही चांगला पाऊस झाल्याने ऊस उत्पादन आणि पर्यायाने साखर उत्पादन वाढले आहे. आता हिच साखर केंद्र सरकार आणि साखर कारखान्यांची डोकदूखी बनली आहे.

देशातील एकूण 310 मेट्रिक टनापैकी महाराष्ट्राच्या कोट्यातील 6 लाख 21 हजार टन साखर निर्यात करण्यास परवानगी मिळावी. यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. मात्र ही साखर विक्री करतानाही तोटा सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्रात 70 ते 80 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन अपेक्षीत असते. मात्र राज्यातील हेच साखर उत्पादन 107 मेट्रिक टन झाले आहे. यातुलनेत उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहारमधील उत्पादनात 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे दिसून येते. यासर्वाचा परिणाम थेट साखर दरावर होत आहे. साखरेच्या दरावर परिणाम झाला नंतर उसाचा ठरलेला दर देता येत नाही. गेल्यावर्षी (2016-17) आणि यावर्षीची (2017-18) अशी एकूण सुमारे 90 लाख मेट्रिक टन साखर जास्त होत असेल तर, पुढील वर्षीचे चित्र आताच स्पष्ट होत आहे.

यावर्षीचा साखर हंगाम सुरू होत असताना कारखान्यांनी जाहीर केलेला उसाचा दर देण्यास अडचणीत येत आहे. ऊस दर जाहीर करताना साखेरचा प्रतिक्विंटल दर 3500 ते 3600 रुपये होता. आता मात्र हाच दर 2400 ते 2500 पर्यंत खाली आहे. पुढील वर्षीही (2019-20) साखरेचे उत्पादन याच पटीत राहणार असल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उसाला अपेक्षीत दर मिळणे कठिण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here