ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य : ऊस मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी

कानपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सरकारचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेश ऊस विकास आणि साखर उद्योग मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी केले. नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपूर आणि उत्तर प्रदेश साखर कारखाना संघाच्यावतीने संयुक्तपणे आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन ऊस विकास आणि साखर उद्योग मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी केले.

मंत्री चौधरी म्हणाले की, साखर कारखान्यांच्या आर्थिक तरलतेमध्ये सुधारणेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. त्यांनी साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकरी आणि इतर भागधारकांच्या हिताचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला. दालमिया भारत शुगर्स लिमिटेडचे सीईओ पंकज रस्तोगी यांनी साखर आणि इथेनॉल उत्पादनाच्या ब्राझिलच्या मॉडेलबाबत आपला अनुभव सांगितला. एनएसआयचे संचालक नरेंद्र मोहन यांनी उद्योजकांना, साखर कारखान्यांच्या पारंपरिक मॉडेलमध्ये बदल करत आउट ऑफ बॉक्स विचार करावा असा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, साखर उद्योगाकडे अनेक संधी आहेत. इथेनॉल ते हायड्रोजन अशी निर्मिती होवू सकते. साखरे ते डाएटरी फायबर, इंधन ते इको फ्रेंडली कटलरीपर्यंत खूप काही करता येणे शक्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here