पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ५ जणांचे अर्ज बाद झाले. तर एकाच गटात दोन-दोन अर्ज भरलेल्यांचा एक अर्ज छाननीच्या वेळी काढण्यात आला. त्यामुळे आता २१ जागांसाठी १९५ उमेदवारी अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली. इच्छुकांमध्ये विविध पक्षांतील वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. या इच्छुकांना माघार घेण्यास लावणे ही पक्षश्रेष्ठींपुढे मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे यंदाची कारखाना निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची होणार याचा फैसला २५ मार्चला होणार आहे.
कारखान्याच्या निवडणूकीसाठी २२६ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यातील २६ अर्ज दुबार भरलेले होते. मुळशी तालुक्यातील पौड-पिरंगुट आणि हिंजवडी-ताथवडे गटात प्रत्येकी १७ अर्ज वैध झाले आहेत. मावळ तालुक्यातील तळेगांव-वडगाव गटात २३ आणि सोमाटणे पवनानगर गटात ३७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. खेड-हवेली-शिरूर मतदार संघात ३० अर्ज वैध झाले. महिला राखीव गटात २०, अनुसुचित जाती/जमाती गटात ८, इतर मागासवर्गीय गटात ३५ तर विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात ८ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. २५ मार्च ही अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे.
२३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
मावळ तालुक्यात तळेगाव-वडगाव मतदार संघ २ हजार २१५, सोमाटणे पवनानगर मतदार संघात ३ हजार २१ असे एकूण ५ हजार २३६ मतदार आहेत. मुळशीतील पौड पिरंगुट ३ हजार ५४६, हिंजवडी-ताथवडे ३ हजार ३०८ असे एकूण ६ हजार ८५४ मतदार आहेत तसेच अन्य खेड हवेली व शिरूर असे ऊस उत्पादक व अनुउत्पादक मिळून एकूण २२ हजार ९१७ सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
महाराष्ट्र : राज्यातील आणखी ५० हजार शेतकऱ्यांना ‘एआय’ प्रकल्पात सहभागी होण्याची संधी
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.