झुरिच: नैसर्गिक आणि आरोग्यदायी पेयाच्या शोधात असणार्या ग्राहकांसाठी नेस्लेने साखरेशिवाय खाद्यपेय तयार करण्याचा मार्ग शोधला आहे. पदार्थ गोड करणार्या कोको झाडाच्या उरलेल्या साहित्यापासून नेस्ले कंपनीने साखरेशिवाय गोड चॉकलेट तयार करण्याचा नवा मार्ग शोधला आहे.
वाढता लठ्ठपणा आणि मधुमेह या आजारांपासून देश दूर रहावा यासाठी सरकार आणि ग्राहकांकडून आरोग्यदायी अन्न आणि पेय निर्मितीसाठी अन्न आणि पेय उद्योगात दबाव वाढतो आहे. नेस्ले कंपनीच्या या हालचालीमुळे या उद्योगात त्यांचे स्थान बळकट होवू शकते.
जगातील सर्वात मोठ्या खाद्यपेयाच्या कंपनीने साखरेऐंवजी फळांचा गर वापरण्याचे तंत्र पुढच्या वर्षी इतर देशात मिठाईसाठी वापरण्याचे नियोजन केले आहे. नेस्लेच्या नवीन डार्क चॉकलेटमध्ये 40% साखर कमी असेल.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.