धामपूर : धामपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम ३० ऑक्टोबर रोजी सुरू झाला. २७ फेब्रुवारी रोजी गाळपाला ११९ दिवस पूर्ण झाले. यांदरम्यान, कारखान्यात आतापर्यंत १.४० कोटी क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. गाळप हंगाम १५ ते २० मेअखेरपर्यंत सुरू राहील असे सांगण्यात आले. धामपूर साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र ५० हजार हेक्टरचे आहे. अद्याप २५ हजार हेक्टर क्षेत्र शिल्लक आहे.
धामपूर कारखान्याचे उपाध्यक्ष एम. आर. खान यांनी सांगितले की, यावेळी उसाचे गाळप सत्र सुरळीत सुरू आहे. यावेळी कारखान्याने २ कोटी ३५ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यापैकी २७ फेब्रुवारीपर्यंत १ कोटी ४० लाख क्विंटलचे गाळप झाले आहे. उद्दीष्टाच्या ५५ ते ६० टक्के गाळप झाले आहे. साखरेचा उताराही योग्य प्रमाणात आहे. जर साखर कारखाना याच गतीने सुरू राहीला तर गाळप हंगाम १५ ते २० मेपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. गेल्यावर्षी धामपूर साखर कारखाना सात नोव्हेंबर रोजी सुरू झाला. त्याचा हंगाम ११ जून रोजी पूर्ण झाला होता. गेल्यावर्षी कारखान्याने जवळपास २ कोटी ३२ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते.
शेतकऱ्यांना सुधारीत ऊस जातींची लागवड करण्याचे आवाहन. साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारखान्याकडून शेतकऱ्यांना सीओ ०२३८, तो ११८ या प्रजातींची लागवड करावी. ०२३८ प्रजाती सुधारित असणे दरजेचे आहे. को ११८ आणि सीओ १५०२३ या प्रजातींचा ऊस कमी प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकरी नर्सरीतून या प्रजातीचे बियाणे आणत आहेत. आगामी सत्रात हा प्रजातींचा ऊस वाढण्याची शक्यता आहे.