संकटातही साधली संधी, जून महिन्यात १.४४ लाख कोटी रुपये जीएसटी कलेक्शन

नवी दिल्ली : देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होवून पाच वर्षे पूर्ण झाली आहेत आणि टॅक्स कलेक्शनच्या आघाडीवर सरकारने चांगली कामगिरी केली आहे. अर्थ मंत्रालयाने जून महिन्यातील जीएसटी वसुलीची आकडेवारी प्रकाशित केली आहे. त्यानुसार जून महिन्यात जीएसटी कलेक्शन वार्षिक स्तरावर ५६ टक्क्यांनी वाढून १.४४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सरकारने जीएसटी १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मिळविण्याचा हा सलग पाचवा महिना आहे.

याबाबत आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, जून २०२२ मध्ये जीएसटी कलेक्शन १,४४,६१६ कोटी रुपये झाले आहे. सरकारला मासिक स्तरावर फायदा झाला आहे. यापूर्वी एक महिना आधी, मे २०२२ मध्ये सरकारला १.४० लाख कोटी रुपये जीएसटी मिळाला होता. आतापर्यंत झालेली ही द्वितीय क्रमांकाची कर वसुली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात जीएसटीने उच्चांकी कमाईचा विक्रम नोंदवला आहे. एप्रिल २०२२ मध्ये १.६८ लाख कोटी रुपये जीएसटी करवसुली झाली होती. मार्च २०२२ मध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस १.४२ लाक कोटी रुपये मिळाले होते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात जीएसटी कलेक्शन १.३३ लाख कोटी रुपये झाले होते. सध्या देशात जीएसटीचा पाचवा वाढदिवस साजरा केला जात आहे. हा दिवस जीएसटी दिन म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जून महिन्यातील आकडेवारी जाहीर करत आनंद व्यक्त केला आहे. जून महिन्यात १.४० कोटी रुपये राहील अशी शक्यता व्यक्त केली होती. आमची मासिक करवसुली यापेक्षा कमी झालेले नाही. अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, या महिन्यात ग्रॉस जीएसटी कलेक्शन १,४४,६१६ कोटी रुपये झाले आहे. यामध्ये सेंट्रल जीसएटी २५,३०६ कोटी रुपये आहे. तर स्टेट जीएसटी ३२,४०६ कोटी रुपये आहे. इंटिग्रेटेड जीएसटी ७५,८८७ कोटी रुपये आहे. आणि सेसच्या ११,०१८ कोटी रुपयांचा यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here