नवी दिल्ली : आयकर विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये आतापर्यंत १.९५ कोटी करदात्यांना १.९८ लाख कोटी रुपयांचा रिफंड जमा केला आहे. विभागाने नुकतीच ही माहिती दिली.
आयकर विभागाने यामध्ये १.९२ कोटी व्यक्तिगत आयकरदात्यांना ७०५७२ कोटी रुपयांचा रिफंड दिला आहे. तर २.१९ लाख कार्पोरेट करदात्यांना १.२७ लाख कोटी रुपये रिफंड देण्यात आला आहे. आयकर विभागाने एका ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने (सीबीडीटी) एक एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवरी २०२१ या दरम्यान १.९५ कोटी करदात्यांना १,९८,१०६ कोटी रुपये रिफंड दिला आहे.