लातूर : तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखान्याने केवळ ४३ दिवसांमध्ये १,६२,७१० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यातून १,७७,८५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख यांच्या हस्ते सोमवारी साखरेचे पूजन करण्यात आले. चेअरमन देशमुख, व्हाईस चेअरमन रविंद्र काळे यांच्या हस्ते कार्यकारी संचालक ए. आर. पवार, व्यवस्थापक अजय कोळगे, ओमप्रकाश चांडक, भाऊसाहेब खरात, मुख्य शेतकी अधिकारी देविदास मोकाशे यांच्यासह खातेप्रमुख, विभाग प्रमुख आदींचा सत्कार करण्यात आला.
साखर पोते पूजन कार्यक्रमास संचालक गोविंद बोराडे, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, रंजित पाटील, अनंत बारबोले, अमृत जाधव, सुर्यकांत सुडे, गोविंद डुरे, सुभाष माने, संजय पाटील खंडापुरकर, ज्ञानोबा पडीले, मन्मथ किडे, विजय निटुरे, मारोती पांडे, बाजार समितीच्या उपसभापती प्रिती भोसले, जिल्हा बँकेचे संचालक लक्ष्मीबाई भोसले, पंडीत ढगे, राजेंद्र पाटील, विनोबा पाटील, संतोष तिडके आदी उपस्थित होते.