मेरठ : मवाना साखर कारखान्याने गुरुवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०.३५ कोटी रुपये अदा केले आहेत. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठविण्यात आले आहेत. गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये खरेदी केलेल्या ४३१ कोटी रुपयांच्या उसाचे आतापर्यंत पैसे देण्यात आले आहेत.
मवाना कारखान्याचे ऊस विभागाचे वरिष्ठ महा व्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून साखर विक्री सुरू असून त्यातील ८५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे. ऊसाच्या सर्वेक्षणाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. ऊस विभागाच्या आदेशानुसार ऑनलाईन घोषणापत्र शेतकऱ्यांनी भरून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची धास्ती असल्याने सर्वांनी मास्कचा वापर करावा असे त्यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link