सहकारमहर्षी थोरात साखर कारखान्यात १० लाख क्विंटल साखर उत्पादन : कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर

अहिल्यानगर (अहमदनगर) : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने यंदा, २०२३- २४ या गळीत हंगामात गेल्या १३० दिवसांत ९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १० लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी ही माहिती दिली. कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उसाची कमतरता व तीव्र स्पर्धा असल्याने गळीत हंगाम १०० दिवसही चालणार नाही, असे चित्र होते. परंतु कारखान्यावर कार्यक्षेत्रात व बाहेरील ऊस उत्पादकांचा असलेला विश्वास यामुळे गळितासाठी पुरेसा ऊस मिळाला, असे त्यांनी सांगितले.

कार्यकारी संचालक घुगरकर म्हणाले की, कारखान्याने लागवड करण्यासाठी १.५० रुपये प्रती रोप या दराने व नवीन लागवडीसाठी अमृत शक्ती दाणेदार खत सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेतला आहे. त्याचा फायदा ऊस उत्पादकांनी घेऊन जास्तीत जास्त खोडवा पीक ठेवून नवीन ऊस लागवड क्षेत्रात वाढ करावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळाने केले आहे. यंदा कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादनात हेक्टरी १५ ते २० टन वाढ झाली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे. एकूण ऊस गाळप १० लाख मेट्रिक टनांपर्यंत जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here