सहारनपूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून १००.३४ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे सुमारे ६३० कोटी रुपये थकीत आहेत.
साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अदा केलेले १०० कोटी रुपये हे एका दिवसात दिलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. अलिकडेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी आणि मंडल आयुक्त ए. व्ही. राजमौली यांच्यापासून जिल्हाधिकारी अखिलेश सिंह यांच्यापर्यंत सर्वांनी कारखान्यांवर थकबाकी देण्यासाठी दबाव आणला आहे. त्यामुळे एका दिवसात इतकी मोठी रक्कम शेतकऱ्यांना वितरण केले आहे.
जिल्हा ऊस अधिकारी कृ्ष्णमोहन मणी त्रिपाठी यांनी सांगितले की, जिल्ह्यात गुरुवारी साखर कारखान्यांना १००.३४ कोटी रुपयांची बिले अदा झाली आहेत. त्यामध्ये देवबंदने १९ कोटी रुपये, गांगनौली कारखान्याने ६.२३ कोटी, नानौता कारखान्याने ५०.०९ कोटी रुपये, सरसावा कारखान्याने २५.०१ कोटी रुपये यांचा समावेश आहे. हे पैसे मिळाले असले तरी साखर कारखान्यांकडे ६३० कोटी रुपये ऊस बिले थकीत आहेत.