सहकार महर्षि मोहिते- पाटील कारखान्यातर्फे १०० टक्के एफआरपी अदा : चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील

सोलापूर : अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याने २०२२-२३ च्या गाळप हंगामात १३० दिवसात १०,५६,७८० मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून १०,४२, ५६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११.१५ टक्के होता. उसाची एफआरपी रक्कम २,५८३ रुपये प्रति टन होती. त्यापैकी कारखान्याने यापूर्वी प्रति टन २,४८३ रुपये बँक खात्यावर वर्ग केले होते. उर्वरीत देय प्रति टन १०० रुपये २८ ऑगस्ट २०२३ रोजी बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.

चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले कि, केंद्र शासनाने सहकारी साखर कारखान्यामध्ये साखर विक्री किमान आधारभूत किंमत, साखर निर्यात, इथेनॉल उत्पादन व विक्री याकरिता धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे त्याचा फायदा साखर कारखान्यास झाला आहे. तसेच इथेनॉल निर्मितीचे उद्दीष्ट ठेऊन साखरेचे उत्पादन कमी केल्याने साखरेला चांगला दर मिळण्यास मदत झाल्याची भावना मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली.

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालिका, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, भिमराव काळे, अमरदिप काळकुटे, श्रीकांत बोडके, सौ. हषार्ली निंबाळकर, श्रीमती पुष्पा महाडीक तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here