बुलंदशहर : साबितगढ येथील त्रिवेणी साखर कारखान्याकडून गळीत हंगाम २०२२-२३ मधील सर्व ऊस बिले शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांकडे या हंगामातील कोणतीही थकबाकी आता शिल्लक नाही, असे सांगण्यात आले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याचे युनिट हेड प्रदीप खंडेलवाल यांनी सांगितले की, आमच्या साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देणे या गोष्टीला आमचे प्राधान्य आहे. शेतकऱ्यांना नियमानुसार उसाचे पैसे देताना त्यांना हंगामात कोणत्याही प्रकारची अडचण येवू नये या गोष्टीकडे कारखान्याच्या वतीने लक्ष देण्यात येते. आगामी गळीत हंगामामध्ये कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पाठवावा. त्यासाठी ऊस लागवड मोठ्या प्रमाणात करावी असे आवाहन खंडेलवाल यांनी यावेळी केले.