शामली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अखेर शामली साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामातील ११.०७ कोटी रुपयांची ऊस थकबाकी दिली आहे. आता गेल्या हंगामातील शंभर टक्के ऊस बिले मिळाली आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील कारखान्यांकडे गेल्या तीन महिन्यांतील म्हणजेच नव्या हंगामातील २०२२-२३ मधील ४७६.७० कोटी रुपयांची थकबाकी आहे.
याबाबत अमर उजाला डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गेल्या हंगामात २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ११४२.९६ कोटी रुपयांचा ३५५.१४ लाख क्विंटल ऊस खरेदी केला होता. नवा हंगामा सुरू झाला तरी हे कारखाने जुनी बिले देण्यास पिछाडीवर होते. जानेवारीत मऊ कारखान्याने गेल्या हंगामातील १०० टक्के ऊस बिल अदा केले. बजाज समुहाच्या थानाभवान कारखान्याने विजेचे १००० कोटी रुपये दोन टप्प्यात मंजूर झाल्यानंतर या कारखान्याने १ अब्ज ७ कोटी रुपये शेतकऱ्यांना याच महिन्यात दिले. शामली कारखान्याकडे ११.०७ कोटी रुपये थकीत होते. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी कारखान्याने हे पैसे अदा केले आहेत. नव्या हंगामातील ५०० कोटी रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे. त्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.