‘शाहू साखर’चे ऊस बिलापोटी प्रतिटन १०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा : चेअरमन सुहासिनीदेवी घाटगे

कोल्हापूर : श्री छत्रपती शाहू साखर उद्दिष्ट कारखान्याने २०२३-२४ या हंगामातील ऊस बिलापोटीची उर्वरित प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे ९ कोटी ९७ लाख तसेच उशिरा ऊस गळीत हंगामाच्या पहिल्या हप्त्याची ३ कोटी ३० लाख अशी एकूण १३ कोटी २७ लाख रुपये रक्कम बँकेकडे वर्ग केल्याची माहिती चेअरमन सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिली. तरी ऊस पुरवठादारांनी संबंधित बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

कारखान्याने मागील गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गळीतासाठी आलेल्या उसाची रक्कम म्हणून प्रति मे. टन ३२०० रु. व कारखान्याच्या गळीत पूर्ततेसाठी १६ जानेवारीनंतर आलेल्या गळीतासाठी प्रतिपंधरवडा उशिरा गळीत अनुदान योजना जाहीर केली होती. या हंगामासाठी प्रतिटन ३१०० रुपये अदा केले आहेत. सर्वांची येणारी दिवाळी गोड व्हावी यासाठी कारखाना व्यवस्थापनाने ऊस बिलापोटीची उर्वरित रक्कम प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम व जाहीर केलेल्या उशिरा गळीत अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम दि. १८ ऑक्टोबर रोजी वर्ग करण्यात येत आहे. येत्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक व बिगर ऊस उत्पादक सभासद यांनी पिकविलेला सर्व ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याच्या चेअरमन सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले आहे.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here