ढाडा साखर कारखान्याकडून १०७४.१२ कोटी रुपयांची ऊस बिले अदा

कुशीनगर : अवध शुगर अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट असलेल्या न्यू इंडिया शुगर मिल ढाडाने चालू गळीत हंगामातील २२ जानेवारीपर्यंत खरेदी केलेल्या ऊसापोटी शेतकऱ्यांना बिले अदा केली आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे पैसे पाठविण्यात आले आहेत.

याबाबत लाइव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कारखान्याचे कार्यकारी अध्यक्ष करण सिंह व उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय यांनी सांगितले की, एक डिसेंबर रोजी कारखान्याच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. कारखान्याने गळीत हंगामात शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्वरीत ऊस बिले अदा करण्याचा प्रयत्न केला आहे. २२ जानेवारीपर्यंत खरेदी केलेल्या ऊसापोटी १०७४.१२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. सर व्यवस्थापक करण सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले अदा करण्यास कारखाना कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी ऊस खरेदी केंद्रास साफ, ताजा ऊस पुरवठा करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पाला असलेला आणि वाळलेला ऊस कारखान्याला पाठवल्यास त्याचा फटका कारखाना आणि शेतकऱ्यांनाही बसतो असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी आगामी काळात ०११८, १५०२३ तसेच ९८०१४ व ९४१८४ या प्रजातींची लागवड करावी. कारखान्याने नव्या प्रजातीचे १५०२३ व १४२०१ चे बियाणे देण्यात आल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here