पंजाब : पंजाब मध्ये साखर कारखान्यांच्या विस्तारासाठी, विकासासाठी सरकार 108 करोड रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी भोगपूर साखर कारखान्याचा दौरा केला. दौर्यानंतर ते म्हणाले, कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ करुन ती प्रति दिन तीन हजार टन इतकी करण्यात येईल. हे संयंत्र 2019-20 या गाळप हंगामासाठी सुरु केले जाईल.
रंधावा म्हणाले, याशिवाय 15 मेगा वॅट विजेचे उत्पादन करणारे कोजेनरेशन प्लँटही बसवण्यात येईल. यामध्ये 8.54 मेगा वॅट वीज पीएसपीसीएल या विज उपक्रमासाठी दिली जाईल. यामुळे कारखान्याची गाळप क्षमता वाढेल. ती वाढली तर, शेतकर्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल. राज्यात कुठलाही सहकारी साखर कारखाना बंद होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.