पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल उमेदवारी अर्जांपैकी ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यशवंत कारखान्यासाठी एकूण ३२० अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामध्ये दुबार, तिबार असे मिळून ५१ उमेदवारांनी अर्ज भरले होते. आता निवडणूक रिंगणात २५८ उमेदवार राहिले आहेत. सोमवारी झालेल्या छाननीनंतर सूत्रांनी ही माहिती दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहकार उपनिबंधक शीतल पाटील यांनी छाननी केली. त्यामध्ये ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात आले. निवडणूक ही बिनविरोध व्हावी आणि साखर कारखाना सुरू राहावा, अशीऊस उत्पादक शेतकऱ्यांची भावना असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. सद्यस्थितीत १३ ते २७ फेब्रुवारी रोजी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. त्याचदिवशी निवडणूक होईल की बिनविरोध संचालक मंडळ निवडले जाणार याचे चित्र स्पष्ट
होण्याची अपेक्षा आहे.