कोल्हापूर : आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया भारत शुगर साखर कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ यूनिट हेड एस. रंगाप्रसाद यांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून विधिवत पूजा करून झाला. १२ व्या गळीत हंगाम प्रारंभी प्रथम आलेले बैलगाडीवान धोंडिराम हांडे (पोर्ले) धोंडिराम हांडे (पोर्ले तर्फ ठाणे) आणि ट्रॅक्टरमालक संदीप पाटील (आसुर्ले) यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वर्षाच्या गळीत हंगामात ११ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन एस. रंगाप्रसाद यांनी केले. जनरल मॅनेजर (केन ) श्रीधर गोसावी, आनंद कदम, सुहास गुडाळे, मणिकंडन, सुभाष डोरा, शिवप्रसाद पडवळ, टी. कनकसबाई, मनीष अग्रवाल, संगमेश्वर, सीताराम रेड्डी, संग्राम पाटील, प्रवीण गोजारी, बबन रेपे, श्रीकांत मुक्कर, विलास पाटील, सुनकरा रेड्डी, कामगार नेते विलास शिंदे, एम. एम. पाटील आदी उपस्थित होते.