कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील ओंकार शुगर फराळे युनिट तीनने राज्य साखर संघाच्या त्रिपक्षीय तोडणी दर मजुरीवाढ गेल्या हंगामापासून लागू केली आहे. त्याप्रमाणे तोडणी दर ३४ टक्के वाढीसह ३६६ रुपये व त्यावरील २० टक्के कमिशन ७३.२० असे एकूण ४३९.२० रुपये प्रती टन रक्कम होते. यातील फरक प्रती टन ११४.१७ रु.डणी वाहतूकदारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. ओंकार शुगरचे चेअरमन बाबुराव बोत्रे- पाटील यांनी ही माहिती दिली.
कारखान्याच्या युनीट तीनच्यावतीने गळीत हंगामाची तयारी सुरू आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस नोंदी द्याव्यात आणि ऊस पाठवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. कारखान्याचे जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील, मुख्य शेती अधिकारी समीरकुमार व्हरकट, चिफ अकाऊंटंट शरद पाटील, चिफ इंजिनिअर महांतेश तोडकर, चिफ केमिस्ट कामदेव मुदीराज, केनयार्ड सुपरवायझर राहुल यादव, स्टोअर किपर रोहित जाधव व कर्मचारी उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.