पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. राज्यात ९ एप्रिल २०२१ अखेर ११८ साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे.
साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ९ एप्रिल २०२१ अखेरपर्यंत १८९ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात आपला सहभाग नोंदवला. राज्यात ९८४.१२ लाख टन साखरेचे गाळप झाले असून १०३०.७२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४७ टक्के इतका आहे.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील सर्व ४३ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३५ कारखान्यांचा गाळप हंगाम संपुष्टात आला आहे. नांदेड विभागात १४ कारखाने बंद झाले आहेत. पुणे विभागातील १२ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप पूर्ण झाले आहे. अहमदनगरमध्ये ७ कारखाने बंद झाले असून औरंगाबादमध्ये ४ साखर कारखाने आणि अमरावतीमध्ये २ साखर कारखाने बंद झाले आहेत. नागपूरमध्ये एक साखर कारखान्याचे गाळप पूर्ण झाले आहे.