शंकर साखर कारखाना निवडणुकीत विरोधी उमेदवारांचे १२ अर्ज बाद

सोलापूर : सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. २१ संचालक निवडीसाठी एकूण ४० उमेदवारांचे ४२ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी छाननीत १२ विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाले. विद्यमान चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या गटाच्या एकाही उमेदवाराचा अर्ज बाद झालेला नाही.

शंकर साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ ते २०२८-२९ पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४० उमेदवारांनी ४२ नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी दाखल अर्जांची छाननी केली. यामध्ये भानुदास सालगुडे-पाटील, लालासाहेब रणनवरे, आप्पा माळी, आनंदा मुळीक, सुभाष सूळ, मधुकर वाघमोडे, रामहरी गोडसे, नारायण वाघमोडे, नीलम सालगुडे-पाटील, नागरबाई पालवे, शरद फुले, नारायण वाघमोडे या १२ जणांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here