कोल्हापूर : अथणी शुगरच्या भुदरगड युनिटमध्ये यंदा ४४ दिवसांत १,१९,५३२ मे. टन ऊस गाळप केले आहे. कारखान्याने सरासरी १०.६५ रिकव्हरीने १२३७०५ क्विटल साखर उत्पादित केली आहे. या हंगामातील १५ डिसेंबरपर्यंतची सर्व ऊस बिले अदा केली आहेत, अशी माहिती कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली. कारखान्याने एकरकमी प्रती टन ३,२०० रुपयांप्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहेत, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
साखर कारखान्याने ऊस तोडणी वाहतुकीची बिलेही जमा केली आहेत. सन २०२३-२४ सालात ज्या शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी पाठवला आहे, त्यांना प्रती टन ३,१०० रुपयांप्रमाणे ऊस बिले मिळाली, त्यांचे उर्वरित प्रती टन १०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा केले आहेत असे मॅनेजिंग डायरेक्टर पाटील यांनी सांगितले. चीफ इंजिनिअर सुरेश शिंगटे, डे. चीफ केमिस्ट प्रकाश हेंद्रे, शेती अधिकारी राजाराम आमते, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब देसाई, डे. चीफ अकाउंटंट जमीर मकानदार यांसह शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार, कर्मचारी उपस्थित होते.