अलीगढ : जिल्ह्यातील ऊस शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. ऊस थकबाकी मिळण्यासाठी वाट पाहणार्या शेतकर्यांना साखर कारखान्यांकडून जवळपास 13 करोड रुपये मिळाले आहेत, जे लवकरच शेतकर्यांच्या खात्यात जमा होतील. वेळेत थकबाकी न भागवल्यामुळे शेतकर्यांना ऊसाच्या पीकात रस नव्हता. या कारणामुळे या परिसरामध्ये ऊस क्षेत्र कमी झाले आहे.
ऊस थकबाकी बराबेर पुढच्या गाळप हंगामात साखर कारखान्यात दुरुस्तींचे काम गतीने सुरु आहे. ऊसाच्या उत्पादनासाठी अलीगढ ची जमीन उपयुक्त आहे. चांगले पीक आणि कारखाने जवळसल्यामुळे शेतकर्यांना ऊसाच्या पीकाकडे आकर्षित केले आहे. पण जेव्हा ऊस पिकासाठी वेळेत पैसे दिले गेले नाहीत, सुविधा कमी होवू लागल्या तेव्हा शेतकर्यांनी ऊस पिकात रस घेणे बंद केले होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.