फिजी : कोरोना वायरसचा परिणाम आता साखर उद्योगावरही दिसू लागला आहे. पहिल्यांदा यामुळे साखर विक्री आणि दरावर परिणाम दिसत आहे. आता अर्थिक तंगीमुळे साखर कारखान्यात काम करणार्या कर्मचार्यांवरही याचा परिणाम पडत आहे.
कोरोना च्या प्रकोपाचा परिणाम आता फिजी च्या साखर कारखान्यात दिसू लागला आहे. सध्याच्या संकटाला लक्षात घेता, फिजी शुगर कॉर्पोरेशन ने आपल्या 130 कर्मचार्यांना चार महिन्याच्या बिनपगारी रजेवर पाठवले आहे. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राहम क्लार्क म्हणाले की, उर्वरीत टॉप कर्मचार्यांच्या वेतनात 15 टक्के, मध्यमवाल्याच्या वेतनात 7.5 टक्के आणि सर्वात कमी वेतन असणार्यांच्या वेतनात 5 टक्के कपात करण्यात येणार आहे. आता यामध्ये कुठला कर्मचारी कुठे फिट होतो, ते त्यांच्या पगारावर अवलंबून राहील.
त्यांनी सांगितले की, आता सध्या आम्ही हे लागू करत आहोत, पण हे कायमस्वरुपी नाही. हे सामान्य होण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.