भोगावती कारखान्याकडून आतापर्यंत १३८ कोटींची ऊस बिले आदा : अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील

कोल्हापूर : शाहूनगर, परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात १२२ दिवसांत ५ लाख १० हजार ६८९ टन उसाचे गाळप करून ६ लाख २९ हजार ३२० क्विंटल साखर उत्पादित केली. सरासरी साखर उतारा १२.३२ टक्के एवढा आहे. कारखान्याने आतापर्यंत १३७ कोटी २७ लाख रुपये ऊस बिलापोटी वर्ग केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील देवाळेकर, उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.

भोगावती कारखान्याने १६ जानेवारी ते २९ फेब्रुवारी अखेरच्या उसाचे प्रती टन ३२०० रुपयांप्रमाणे होणारे ६३ कोटी ८६ लाख रुपयेही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील उसासाठी प्रती टन ३२०० रुपये ऊस दर जाहीर केला होता. आगामी हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, असे अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष कवडे यांनी केले आहे. कारखान्याने कारखान्याने यापूर्वी २ लाख २९ हजार ४१४ मेट्रिक टन उसाचे ७३ कोटी ४१ लाख रुपये पूर्वीच वर्ग केले असून, उर्वरित बिले लवकरच जमा केली जातील, असे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here