मेरठ: मवाना साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ऊसापोटी १४.०३ कोटी रुपये संबंधीतांच्या खात्यावर पाठवले आहेत. कारखान्याने संबंधीत सहकारी ऊस समितीला याबाबतची यादी पाठवली आहे. कारखान्याने २६ नोव्हेंबर २०२० पर्यंतच्या ऊसाचे पैसे दिले आहेत.
कारखान्याच्या ऊस आणि प्रशासन विभागाचे वरिष्ठ महा व्यवस्थापक प्रमोद बलियन यांनी सांगितले की, मवाना कारखान्याने यावर्षी २४ फेब्रुवारीपर्यंत १२५.६३ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत १०.८९ लाख क्विंटल अधिक गाळप झाले आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याकडून एसएमएसद्वारे तोडणीची माहिती मिळाल्यानंतरच ऊस तोडावा. पाला काढून ऊस ठराविक वेळेत ऊस खरेदी केंद्रांपर्यंत अथवा कारखान्याकडे पोहोचवावा असे आवाहन करण्यात आले आहे. ऊस खरेदी केंद्रांवर आधीच ऊस पाठवू नये. जर एखाद्या शेतकऱ्यांने आधीच ऊस पाठवला तर त्याची जबाबदारी कारखाना अथवा ऊस विभाग घेणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.