सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना सर्व यंत्रसामुग्री वेळेत जोडणी करून गळितासाठी सज्ज केला आहे. चालू हंगामामध्ये कारखान्याने १४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊस तोडणीसाठी ४०० चारचाकी वाहने, ६५० अंगद गाडी, ३५० बैलगाडी व १० हार्वेस्टिंग मशीन सज्ज आहेत. चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसास चांगला दर देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी केले. वांगी (ता. कडेगाव) येथे कारखान्याच्या २०२४-२५ च्या २५ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते.
मोहनराव कदम म्हणाले की, शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कारखान्याने उत्तम प्रगती केली आहे. तरी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी कारखान्यास प्राधान्याने पाठवावा. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोसले व त्यांच्या पत्नी सुप्रिया भोसले यांच्या हस्ते बयलर अग्निप्रदीपन करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, बापुसो पाटील, युवराज कदम, पंढरीनाथ घाडगे, दिलीपराव सूर्यवंशी, सयाजी धनवडे, जगन्नाथ माळी, शिवाजी गढळे, डी. के. कदम, संभाजीराव जगताप, शिवाजी काळबाग, कार्यकारी संचालक शरद कदम आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.