१५ हजार शेतकऱ्यांना मिळणार शेतीचे प्रशिक्षण

गोरखपूर : ऊस शेती शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी पिपराइच गोरखपूर येथील उत्तर प्रदेश शेतकरी संस्था तथा प्रशिक्षण केंद्राला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. गोरखपूर, बस्ती आणि आजमगढ विभागातील वीस जिल्ह्यांतील १५ हजार शेतकऱ्यांना ही संस्था देशभरातील ऊस संशोधन केंद्रातील संशोधनाची माहिती देणार आहे. शेतकरी आपल्या ऊस उत्पादकतेमध्ये, साखरेच्या गुणवत्तेत आणि फायद्यात यातून वाढ मिळवू शकतात.

ऊस प्रशिक्षण केंद्रातील सहाय्यक संचालक ओम प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, पूर्वांचलमध्ये ऊस विकास क्षेत्रात विकासाच्या खूप संधी आहेत. २०२१-२२ या वर्षात एकूण १५,००० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दीष्ट आहे. गोरखपूर, देवरिया, कुशीनगर, महराजगंज, बस्ती, संतकबीरनगर, सिद्धार्थनगर, आजमगढ, मऊ, बलिया, गाजीपूर, जौनपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यात प्रशिक्षण दिले जाईल.

ऊस शोध केंद्रातील वैज्ञानिक, सहाय्यक संचालक, ज्येष्ठ ऊस विकास प्रशिक्षक, जिल्हा ऊस अधिकारी, गोरखपूर देवरियाचे ऊस विभागाचे उपायुक्त आणि साखर कारखान्याचे ऊस व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक असे तज्ज्ञ विविध तज्ज्ञांना प्रशिक्षण देतील.

शेतकऱ्यांना या गोष्टीचे मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्यांना ऊसाच्या अत्याधुनिक जातींची माहीती, माती परीक्षण, सुधारणा या आधारावर बियाणे निवड याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. माती परीक्षणाचे महत्त्व, लागवड कशी करावी, संतुलित खत व्यवस्थापन, ऊसासोबतची इतर पिके, खतवापरावर नियंत्रण, किटकनाशकांचा वापर याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here